Tuesday , March 3 2026
Breaking News

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर

Spread the love

 

मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

श्रेयस तळपदेची प्रकृती कशी आहे?
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अंधेरीच्या बेलव्यू रुग्णालयात श्रेयसवर उपचार
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं श्रेयस तळपदे शूटिंग करत होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो त्याच्या घरीही गेला होता. घरी गेल्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी केली.

श्रेयस तळपदेला आज किंवा उद्या मिळणार डिस्चार्ज
श्रेयस तळपदेची तब्येत आता स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. आज किंवा उद्यापर्यंत श्रेयस तळपदेचा डिस्चार्ज मिळू शकतो. श्रेयसच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशातच आता त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *