चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या चंद्रगिरी तालुक्यात हा मोठा अपघात झाला. घटनेनंतर लोकांची प्रचंड गर्दी झाली. बचावकार्य सुरू झाले. पोलीस आणि प्रशासनासह रेस्क्यू टीमदेखील तातडीने हजर झाली. रात्रीचा अंधार असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. परंतु, आज सकाळी रेस्क्यूचे बचावकार्य पूर्ण झाले.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बसमध्ये सुमारे 50 लोक प्रवास करत होते. तिरुपतीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असणार्या बकरापेटा येथे चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस एका खडकाला धडकली आणि दरीत कोसळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …