


पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसर्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
आज, सोमवारी (दि.28) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमममध्ये शपथविधी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान स्टेडियममध्ये लोकांची मोठी उपस्थिती होती. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व असा झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
Belgaum Varta Belgaum Varta