नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही.
19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1 मार्च रोजी 2012 रुपये होती. तर 22 मार्च रोजी त्यात घट होऊन दर 2003 रुपयांवर आला. पण आज 1 एप्रिल रोजी या सिलिंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत या सिलिंडरसाठी आता 1,955 रुपये ऐवजी 2205 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 2,351 रुपये, चेन्नईत 2,406 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी 1 मार्च रोजी 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 9 रुपयांनी कमी झाली होती.
1 एप्रिल म्हणजेच आजपासून 2022-23 हे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. याचबरोबर अनेक नियमही बदलतील. याचा परिणाम आपली कमाई, खर्च आणि गुंतवणुकीवर पडणार आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …