नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली.
दरम्यान, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल आणि इतर अनेकांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात देश-विदेशातील मान्यवर, उद्योगपती, मुकेश अंबानी, अदानी, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, रवीना टंडन, राजकीय नेते आणि विविध राज्यातील मान्यवर सहभागी झाले होते.