Tuesday , March 3 2026
Breaking News

वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

Spread the love

 

जम्मू : जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत कोसळली. या गोळीबारत बस चालकाला गोळी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही ५५ सीटर बस होती आणि ही बस शिवखोडीहून कटराकडे जात होती. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे लोक स्थानिक नसून उत्तर प्रदेशचे भक्त होते. ते शिवखोडीहून कटरा येथे होते. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या घटनेत ३३ जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मात्र प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. संपूर्ण परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दहशतवाद्यांची ही संघटना राजौरी, पूंछ आणि रियासी जिल्ह्यात लपून बसलीय. बचावकार्यासाठी पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल घटनास्थळी पोहोचले आहेत. वैष्णोदेवीजवळील शिवखोडी येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन प्रवासी कटरा येथे परतत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *