Thursday , November 21 2024
Breaking News

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

Spread the love

 

नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने बहुमत मिळवलं आहे. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढली होती. बहुमत मिळवल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीने आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच ते या राज्याचे १३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज (१२ जून) सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यात टीडीपी, जनसेना पार्टी आणि भाजपाने इंडिया आघाडीचा पराभव केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला धूळ चारली आहे. विधानसभा निवडणुकीत नायडूंच्या टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने २१ जागांवर विजय मिळवला. यासह भाजपाला आठ जागा जिंकता आल्या. तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात १६४ जागा जिंकल्या. तर, जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या.

About Belgaum Varta

Check Also

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *