

बेळगाव : राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर संतोषकुमार डी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून त्या पदावर आय. आर. पट्टणशेट्टी यांची नियुक्ती झाली आहे. नंदगडचे पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून रिक्त झालेल्या पदावर रवीकुमार धर्मट्टी यांची नियुक्ती झाली आहे.
खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रभाकर धर्मट्टी यांची कारवार जिल्ह्यातील कद्रा येथे वर्णी लागली आहे. सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी यांची कंग्राळी खुर्द येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर यांची संकेश्वर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. संकेश्वरचे शिवशरण अवजी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. कारवार टाऊनचे पोलीस निरीक्षक रमेश हुगार यांची धारवाड टाऊन पोलीस स्थानकात बदली झाली आहे. आयपीएस अधिकारी सौमेंदू मुखर्जी यांनी बदल्यांचा आदेश जारी केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta