कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवार तारीख 10 रोजी सकाळी उघडकीस आली.
सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील ज्ञानदेव दामू पाटील असे नाव असल्याचे प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदीमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याचे मासेमारी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना दिसले. त्यांनी ताबडतोब कागल येथील पोलीस स्टेशनची संपर्क साधून माहिती दिली. यावेळी कागल पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. नदीमध्ये मृतदेह असून नदीकाठी पांढरा शर्ट, पायातील बूट व टोपी असे साहित्य मिळाले. या साहित्यामध्ये पाहणी केली असता सावर्डे ते कागल बस तिकीट मिळाले. पोलिसांनी ताबडतोब सावर्डे येथील पोलीस पाटील यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सदर घटना कर्नाटक हद्दीत घडली असल्याने कोगनोळी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. यावेळी कोगनोळी पोलिसांनी पाहणी करून मृतदेह संबंधित नातेवाईकांना बोलवून मृतदेहाची ओळख पटवून निपाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उत्तरी तपासणीसाठी पाठवून दिला.
घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनच्या वतीने एएसआय एस आय कंबार, बीट हवलदार राजू गोरखनावर, शिवप्रसाद, कागल पोलीस स्टेशनचे विनायक औताडे, अशोक पाटील, प्रभाकर पुजारी, दीपक वाकचौरे, संग्राम लांडगे आदी पोलीस उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta