निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शेतकरी व भाजीपाला व्यापारी बांधवांनी दसरा व दीपावलीच्या वेळी खरेदी केलेल्या 15 नवीन वाहनांचे माजी नगरसेवक शिवानंद राजमाने यांच्या वतीने वाहन पुजन व सत्कार समारंभ पार पडला. वाहनांची उपलब्धता झाल्याने भाजीपाला शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिवानंद म्हणाले, बोरगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती मालाला योग्य भाव मिळावा म्हणून नगरपंचायतीने भाजीपाला लीलाव खरेदी विक्रीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. दररोज सकाळी 11 ते 2 दरम्यान भाजीपाला लीलावचा कार्यक्रम होत असतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी काटकसर करून आपली उपजीविका करत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन शेतकरी व भाजीपाला उत्पादक सभासदांना प्रोत्साहन देण्यासाठी यांच्या वाहनांचे सामुदायिक पुजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना चांगला लाभ होणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहन मालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रगत शेतकरी सदाशिव भदरगडे, श्रेणीक हवले, सुमीत रोड, नवाज कापसे, उमेश वासकर, रमेश चौगुले, राजू गजरेसह शेतकरी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta