अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘अरिहंत चषक’ या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत बुधवारी (ता. १६) बालगोपाल विरुद्ध गडहिंग्लज सिटी यांच्यात पहिलासामना झाला. त्यामध्ये ३-० गुणांनी बालगोपाल संघ विजयी झाला.
गडहिंग्लज युनायटेड विरुद्ध सिल्वासा युनायटेड यांच्यात दुसरा सामना झाला त्यामध्ये पेनल्टी शूट आउटवर सिल्वासा युनायटेड विजय झाला.
तिसरा सामना बेळगाव ब्रदर शिविरुद्ध मिरज मंगळवार पेठ यांच्यात झाला. पेनल्टी शूटआउटवर बेळगाव ब्रदर्स संघाने विजय मिळवला. चौथा सामना गोवा पोलीस विरुद्ध गडहिंग्लज के बी आर यांच्यात झाला. त्यामध्ये पेनल्टी शूट आउट वर गडहिंग्लज के बी आर विजय झाला.
सलग तीन दिवसापासून ही स्पर्धा पाहण्यासाठी निपाणी शहर व ग्रामीण भागातील फुटबॉलपटूंची गर्दी होत आहे. युवा नेते उत्तम पाटील, धनंजय मानवी, निरंजन पाटील, दीपक सावंत व मान्यवरांच्या हस्ते प्लेयर ऑफ मॅच ट्रॉफी वितरित करण्यात आले.
सामन्यासाठी मंगळूर हुबळी आणि धारवाड येथील पंच कार्यरत आहेत. निपाणी फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षक सचिन फुटाणकर, आंतरराज्य फुटबॉलपटू ओंकार शिंदे हे सामन्याचे समालोचन करीत आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी निपाणी शहर ग्रामीण भागातील फुटबॉल प्रेमींची गर्दी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta