
हदनाळ, आप्पाचीवाडी शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी
कोगनोळी : हदनाळ, आप्पाचीवाडी, कुर्ली, म्हाकवे यासह अन्य गावातील शेतकऱ्यांची काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर ऊस व अन्य शेती अवलंबून आहे. पाण्याअभावी सर्व प्रकारची पीके वाळू लागली आहेत. पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी पाटबंधारे विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यावर्षी हदनाळ, म्हाकवे, आप्पाचीवाडी, कुर्ली व परिसरात ऊस तोडणी नियोजित वेळेप्रमाणे सुरु आहे. त्यामुळे ऊस पिकाची तोडणी गतीने चालू आहे. अनेक साखर कारखान्याच्या वतीने सीमाभागात ऊस उचल करण्यात येत आहे. कालव्याला पाणी नसल्याने परिसरातील ऊभा ऊस वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत आहे.
अनेक परिसरातील शेतकरी ऊस लावणीसह रब्बी हंगामातील शाळू, हरबरा यासह अन्य पीके घेण्यासाठी इच्छूक आहेत. परंतू कालव्याला पाणी नसल्याने त्यांना समस्या निर्माण होत आहे. तरी पाटबंधारे विभागाने कालव्याला त्वरित पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
—————————————————————
कालव्याला पाणी कमी आल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. या विभागाचे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी करणार आहे.
– राजेश डोंगळे, ग्रामपंचायत सदस्य मतिवडे.
Belgaum Varta Belgaum Varta