निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११ हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्केटिंग रॅली सकाळी १० वाजता धर्मवीर संभाजी चौकातून सुरू करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. याशिवाय रॅलीमध्ये पोस्टर्सचा वापर केला होत. बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी प्राचार्या चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मुंबई हल्ल्यातील २६/११ घटनेची माहिती देत विद्यार्थ्यांना राष्ट्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निपाणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुदर्शन आस्के, संचालक डॉ. जोतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील, सेक्रेटरी अमर चौगुले, स्केटिंग शिक्षक इंद्रजित मराठे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta