Saturday , November 7 2026
Breaking News

मुंबईमधील हल्ल्यातील शहिदांना अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अभिवादन

Spread the love
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११  हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्केटिंग रॅली सकाळी १० वाजता धर्मवीर संभाजी चौकातून सुरू करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. याशिवाय रॅलीमध्ये पोस्टर्सचा वापर केला होत. बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी प्राचार्या चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मुंबई हल्ल्यातील २६/११ घटनेची माहिती देत विद्यार्थ्यांना राष्ट्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निपाणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुदर्शन आस्के, संचालक डॉ. जोतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील, सेक्रेटरी अमर चौगुले, स्केटिंग शिक्षक इंद्रजित मराठे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *