निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वार्ड नंबर 24 हा फक्त निवडणुकीपूरता वार्ड झालेला आहे, आमदारकी, खासदारकी, नगरपालिका निवडणूक आली की इकडील लोकांची मतासाठी निवडणुकीला उभारणारे लोक आश्वासनांची खैरात वाटून जे जातात ते पुढच्या निवडणुकीलाच परततात. वृत्तपत्रातून वारंवार वाणी मठ जाधव नगर मधील रस्ते, गटारी, झाडेझुडपे, पुलाच्या अडचणीच्या बातम्या देखील दिल्या आहेत पण या वार्डाकडे नगरसेवक, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधीनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे, ओढा लहान आणि सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात तर पुलावरून पाणी वाहून पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, पाण्याचा प्रवाह कमी होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास 2,3 तास लागतात, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. रस्ता तर खड्डेमय झालेला आहेच, रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठी काटेरी झुडुपे उगवलेली असून ती रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाकलेली आहेत, पथदिपांचा तर पत्ताच नाही अशा खड्डेमय रस्त्यावरून अमलझरी, निपाणी, पट्टणकुडी, गव्हाणी, तंवदी तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची ऊस वाहतुक देखील करतांना त्रास होतोच त्याबरोबर नागरिकांना महिलांना रहदारीची वर्दळ देखील त्रासदायक ठरत आहे, रस्ता खड्डेमय असल्यामुळं जिव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करणे भाग पडत आहे, दुपारी आणि संध्याकाळी तर मध्यपींचा सुळसुळाट असतो. कांही वेळा तर वादविवाद, भांडणाचे प्रकार, लूटमार, असे वाईट प्रसंग घडलेले आहेत, त्यामुळं येथील ग्रामस्थांनी लोकप्रतीनिधी व नगरपालिकेच्या कारभाराला कंटाळून श्रमदानातून स्वछता मोहिम करण्याचा विडा उचलून आज सकाळपासून दुपारी 4 पर्यंत रस्त्याच्या आजूबाजूची काटेरी झुडुपे, रस्त्यावर्ती आलेल्या झाडांच्या फांद्या, बेटाच्या मेसकाठ्या तोडून रस्ता मोकळा करून लोकांना रहदारीसाठी खुला करून प्रामाणिक कार्य केले, पुढील रविवारी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही बाजूने स्वच्छता करण्याचे एकमताने ठरलेले आहे. या श्रमदानासाठी प्रकाश जाधव, संजू कांबळे, संजय कट्टीमनी, नागेश जाधव, आकाश जाधव, बळी चव्हाण, मिलिंद चव्हाण, शुभम चव्हाण, सुदर्शन पोवार, साकीब जमादार, मामु जमादार, सलमान जमादार, श्रेयश बुडके, मुबारक चांदखान, साहिल मकांनदार, आनंद येळीगट्टी, विशाल जाधव, प्रथमेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta