निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्षाच्या येथील विभागाच्या वतीने संविधान दिवसाचेऔचित्य साधून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपालिका येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय जत्राट वेस येथील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
आम आदमी पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष डाॅ. राजेश बनवन्ना यांनी भारतीयसंविधानातील सखोल गोष्टींवर विश्लेषण केले. यावेळी प्रा. कांचन पाटील-बिरनाळे यांनी, धार्मिक ग्रंथाप्रमाणे संविधान संरक्षण व आकलन ही काळाची गरज असल्याचे सांगितले.आम आदमी पार्टीच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त निपाणी संपर्क कार्यालयात सामाजिक जाणिवेतून समाजातील वयस्कर, निराधार महिलांचा यथोचित आदरपूर्क सत्कार करण्यात आला. त्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डाॅ. राजेश बनवन्ना, आदर्श गिजवणेकर, हसन मुल्ला, अक्षय कार्वेकर, राजू हिंग्लजे, दिपक शिंदे, नंदकिशोर कंगळे, कृष्णा, योगेश, शंकर, संतोष, किरण पोळ, यासीन, सचिन, प्रकाश पोळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta