विविध मागण्यांचे निवेदन : पावरलूम कारखानदार, कामगारांचा समावेश
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य विणकर संघाच्या निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील कारखानदार, मजूर आणि इतर घटकातर्फे विविध मागण्यासाठी सोमवारी (ता.२८) दुपारी येथील तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला. त्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांना मान्य केल्यास या पूर्ण काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघातर्फे देण्यात आला.
येथील अक्कोळ क्रॉस येथून विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणा देत बस स्थानक, साखरवाडी, बेळगाव नाका मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत करून विणकर संघाचे पदाधिकारी, कारखानदार व कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या.
निवेदनातील माहिती अशी, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर व्यावसायिक विणकरांसाठी कामगार सुविधांची अंमलबजावणी करावी. हातमाग, यंत्रमाग, मजूर विणकर, रंगरंगोटी, सूतकाम करणारे, भटक्यांसाठी प्रत्येक यंत्रमागमागे ३ ते ४ जण काम करतात. त्या मजुरांच्या सुविधांची गरज आहे. लाखो कुटुंबांचा विणकामावर उदरनिर्वाह सुरू आहे.राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी संस्थांमधील विणकरांची कर्जमाफी करावी. बीडीसीसी आणि केएसएफसी मध्ये डायरेक्ट क्रेडिट सुविधा द्यावी. ५५वर्षांच्या विणकरांसाठी ५००० रुपये मासिक पेन्शन मिळावी.
विणकर सन्मान योजनेत विजेवर चालणाऱ्या लूमच्या विणकरांचा समावेश करण्यात यावा. विणकर व शेतकर्यांसाठी वर्षाला किमान १० हजार रुपयांची योजना लागू करण्यात यावी.
लूम वर्कशॉप, घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये अनुदान देऊन बेघर कुटुंबांना भूखंड देण्यात यावेत.
कर्जबाजारीपणामुळे ३८ जणांनी आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबीयांना किमान १० लाखाची नुकसान भरपाई द्यावी.मोफत वीज द्यावी. विणकर राहत असलेल्या ठिकाणी सरकार टायटल डीड आणि सीटीएस जारी करेल त्याला उत्तरे दिली पाहिजेत. विणकरांना १० लाखांपर्यंत १५ टक्के दराने २० लाखांपर्यंत २४ टक्के दराने खेळते भांडवल कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. कच्च्या धाग्यावर प्रक्रिया करतानाची सरकारने जीएसटीने दूर करावी. ध्वनिप्रदूषणाची समस्या सोडवण्या साठी कायद्यात सुधारणा करावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
येथील अक्कोळ क्रॉस येथून विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणा देत बस स्थानक, साखरवाडी, बेळगाव नाका मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत करून विणकर समाजातील पदाधिकारी व कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या. मोर्चा प्रसंगी विणकर समाजाचे राज्याध्यक्ष शिवलिंग टिरके, राजेंद्र मिरजी, अर्जुन कुंभार, लक्ष्मण डोनवाडे, सोमनाथ परकाळे, भीमराव खोत, अण्णाप्पा नागराळे, शाहीर कुंभार, भीमराव खोत, अनिल पाटील, सुधीर संकाजे यांच्यासह निपाणी, चिकोडी तालुक्यातील विणकर, कारखानदार कामगार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta