माजी मंत्री विरकुमार पाटील : शिरगुप्पी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी
निपाणी : २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार आहेत. काकासाहेब पाटील हे संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आपली प्रमुख लढाई ही भाजपाशीच होणार असून आपण सर्वांनी काकासाहेब पाटील व काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे राहावे, असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. शिरगुपी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, शिरगुप्पीकरांनी प्रत्येक वेळी सतत माझ्यावर विश्वास दाखवला आहे. शिरगुप्पी गावच्या मूलभूत सुविधा विकासासाठी प्राधान्य देऊन सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढे ही आपण असाच माझ्यावर विश्वास दाखवून आपल्या पाठीशी आपण खंबीर उभे रहावे. २०२३ ची विधानसभा निवडणूक आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही दबावाला व अपप्रचाराला बळी न पडता आपण काँग्रेस पक्षासोबत एकजुटीने राहावे.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अशोक पाटील, निकु पाटील, एल. जी. हजारे, प्रदीप मोकाशी, रावसाहेब गुरव, पांडुरंग डाफळे, रमेश बुवा, प्रकाश डाफळे, ग्रामप पंचायत सदस्य तुकाराम पायमल, मारुती कुंभार, भोपाल रोड्डे, विवेक मोकाशी, धनाजी जाधव, हिंदुराव कांबळे, अंकुश चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta