युवा नेते उत्तम पाटील : संस्थेत सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : जनवाड सारख्या ग्रामीण भागात सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे. गरजवंतांना वेळेत कर्ज देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच विक्रमी ठेवींचा टप्पा गाठला आहे. सभासद, जनवाडमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेली ही संस्था सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करेल, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
उत्तम पाटील यांनी जनवाड येथील सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीच्या नूतन वास्तु स्थलांतर शुभारंभाचे औचित्य साधून सदिच्छा भेट देऊन ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात आपण राजकारण विरहित काम केल्यास नक्कीच संस्था आर्थिक प्रगतीपथावर येते. अरिहंत संस्थेने कर्नाटक व महाराष्ट्रात आपले नावलौकिक मिळवले आहे. सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्राला ही प्राधान्य दिल्याने अरिहंत म्हणजे सहकाराचा मानबिंदू ठरला आहे. संस्था चालकांनी सिद्धेश्वर संस्थेच्या माध्यमातून सभासद व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण भागातील अर्थकरण वाढीस सहकार्य करावे असे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन धोंडीराम संचालक मंडळाच्या हस्ते उत्तम पाटील यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास अध्यक्ष धोंडीराम पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, चंदू पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष महिंद्रकुमार मुधाळे, संस्थेचे उपाध्यक्ष सिदगौडा पाटील, संचालक बाबासाहेब मगदूम, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, राजू मगदूम, रामा पाटील, स्वप्नाली पाटील, पूजा मगदूम, मारुती पुजारी, चंद्रशेखर काळे, सिद्धप्पा गावडे, रामा चौगुले, नितीन मोकाशी, दत्ता मोकाशी यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta