Sunday , September 8 2024
Breaking News

’भुमी सेक्शन’मधील समस्या लवकरच दूर

Spread the love

तहसीलदार डॉ. भस्मे : रयत संघटनेने मांडल्या समस्या
निपाणी : गेल्या तीन वर्षापासून अतिवृष्टी आणि महापुराचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. नदीकाठावरील अनेक गावातील घरे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पण आजतागायत नुकसान भरपाई मिळालेली नाही. मात्र सध्या एकरी केवळ 4 हजार 500 रुपये घोषणा करून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. त्यामुळे रयत संघटनेने एकरी 25 हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार ती मिळाली पाहिजे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याशिवाय भूमी सेक्शनमधील समस्या लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी दिले.
चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार व पदाधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, घरकुल आणि पीक नुकसान भरपाई लाभार्थींची नावे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली पाहिजे.
निपाणी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर सदलगाव भागातील काही गावे या तालुक्यात समाविष्ट केली आहेत. पण त्या गावांची माहिती निपाणी येथील तहसीलदार कार्यालयात उपलब्ध होत नाही. परिणामी शेती व शिक्षणासंदर्भात मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे तात्काळ ’भूमी’ मधील डाटा येथील संगणकामध्ये घेऊन शेतकर्‍यांची सोय करावी. यापूर्वी झालेल्या इतर तालुक्यामध्ये सर्वस्वय असताना निपाणीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यापुढील काळात तालुका पातळीवरील शेतकर्‍यासाठीच्या असलेल्या सर्व योजना व माहिती निपाणीत उपलब्ध न झाल्यास रयत संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
तहसीलदार डॉ. भस्मे यांनी, आपल्या कचर्‍यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून लाभार्थींची नावे ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केले जातील.
तर अनेक कुटुंबे अजूनही सरकारी शाळेत वास्तव्यास असल्याने त्यांची यादी ही जिल्हाधिकार्‍याकडे पाठवली असून लवकरच त्यांची गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले.
यावेळी निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण उपाध्यक्ष सदानंद नागराळे, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण सूतळे, तालुका सचिव कलगोंडा कोटगे, वसंत पोवार, संजय कांबळे, महादेव विटे, अनिकेत खोत, सदाशिव खोत, संजय कांबळे, नारायण पाटील, आनंदा पवार, कुलदीप नुले, महादेव शेळके, संजय जोमा यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *