युवा नेते उत्तम पाटील : ४ राज्यातील राष्ट्रीय संघ सहभागी
निपाणी (वार्ता) : येथील बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संयुक्त रविवार (ता.२२) ते विद्यमाने मंगळवार (ता.२४) अखेर ‘अरिहंत चषक’ पुरुष आणि महिला हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील देवचंद महाविद्यालयाच्या मैदानावर रात्रंदिवस प्रकाशझोतात या स्पर्धा होणार आहेत. त्यातील विजेत्या संघांना रोख १ लाख २५ हजाराची बक्षिसे व अरिहंत चषक दिले जाणार आहे. स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश मधील राष्ट्रीय पातळीवरील संघांचा समावेश असल्याची माहिती बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील यांनी दिली. येथील अरिहंत सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत उद्योग समूहातर्फे मैदानी खेळांना प्राधान्य दिले जात आहे. सीमाभागातील खेळाडूवर अन्याय होत असल्याची जाणीव ठेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यातून युवकांना प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय हॉलीबॉल संघाचे सदस्य प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, या स्पर्धेला कर्नाटक, महाराष्ट्र राज्यसह केंद्र सरकारचे मान्यता आहे. स्पर्धेमध्ये चार राज्यातील ३६ पुरुषांचे संघ १० महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी या स्पर्धेतील संघ निवडला जाणार आहे. महिला, पुरुष सर्व खेळाडूंची सर्व व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी निर्माण केली आहे. स्पर्धेसाठी ४० पदाधिकारी आणि ३० राष्ट्रीय पातळीवरील पंच कार्यरत राहणार आहेत. स्पर्धेत एकूण ५७० खेळाडू सहभागी होणार आहेत. मध्यंतरी खंड पडल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात शहरात हॉलीबॉल सामन्याचा थरार निपाणी व परिसरातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे. बालवीर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा.शिवाजी मोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘अरिहंत चषक’लोगोचे अनावरण झाले.
यावेळी बालवीर स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष पुष्कर तारळे, नगरसेवक संजय सांगावकर, दत्ता नाईक, जय पावले, शौकत मनेर, अनिस मुल्ला, दीपक सावंत,सचिन फुटाणकर, ओंकार शिंदे, भालचंद्र आजरेकर, रोटरीचे अध्यक्ष दिलीप पठाडे, पप्पू शिंदे, शिरीष कमते, इम्रान मकानदार, सुधीर माळवे, दीपक वळवडे, रमीज मकानदार यांच्यासह बालवीर स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आर. जे. सोलापूर यांनी आभार मानले.