संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ
कोगनोळी : येथे आठ दिवसापूर्वी पडलेल्या जबरी दरोडेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने लोखंडी संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिक फॅब्रिकेटर व्यवसायिकाकडे धाव घेत आहेत. काही नागरिकांनी ऑर्डर दिली आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिक हे पुढचे पाऊल टाकत आहे. शनिवार तारीख 7 जानेवारी रोजी येथील कोगनोळी हणबरवाडी रस्त्यावरील शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रशेखर पाटील उर्फ सी वाय पाटील यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडे टाकून व माराहाण करुन 30 तोळे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. यामुळे नागरिक महिला व लहान मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर येथील महिला व नागरिक सोने-चांदीच्या वस्तू बँकेत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच युवकांच्या वतीने रात्री घस्त घालण्याचे काम हे सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने दरोड्याचा तपास जरी सुरू असला तरी गेले आठ दिवस उलठले तरी अद्याप जबरी चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांना पोलीस प्रशासनाने ताबडतोब पकडून शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.