विद्यार्थ्यांनी बनवले अनेक पदार्थ : मान्यवरांनी घेतली चव
निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील हौशाबाई विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन मराठा मंडळ संचलित, बालवाडी विभाग, विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन आणि मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झंकार – २०२३’ हा वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत ‘फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अनेक पदार्थांच्या घमघमाट सुरू होता. यावेळी अनेक मान्यवरांनी विविध पदार्थांची खरेदी करून त्याची चव घेतली. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी होत्या.
प्रारंभी कारदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन झाले
हळदी कुंकू कार्यकमात सत्रात संपन्न झाला.
संगीता कदम, सुप्रिया पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील, उमा पाटील, ज्योती कदम, कल्पना साळवे, स्मिता भराडे, विजया बुडके, मंजिरी पाटील, मेघा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खास खवैयासाठी खमंग आणि चटकदार अशा जंक फुड बरोबरच शेंगाच्या पोळ्या, वरती रवाळ तूप, इडली- वडा, आंबोळी, पुरी भाजी, नानाविध गोड,तिखट पदार्थ आणि खास भुकेल्यां पालक-बालकानी खाद्यपदार्थावर विशेष ताव मारला. संस्थेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश कदम, मुख्याध्यापक बाळासाहेब मोहिते, संजय पाटील, उपाध्यक्षा कल्पना देसाई, आय. टी. आय. चे अविनाश भोसले, मराठा मंडळ हायस्कूल आणि प्राथमिक शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत खास मराठमोळ्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta