कोगनोळी : येथील संयुक्त वार्ड नंबर तीन मधील ग्रामस्थ, युवक यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भगवा चौक परिसराची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. यावेळी माजी सैनिक बाबुराव गायकवाड, सचिन इंगवले, उद्योगपती शहाजी चव्हाण, यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर 3 मधील सर्व युवकांच्या हस्ते पूजन केले.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता डॉल्बीच्या ठेक्यांमध्ये तरुणांनी चांगलाच ठेका धरल्याचे दिसून आले. डॉल्बी पाहण्यासाठी कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, कागल, करनूर, लिंगनूर आदी परिसरातून तरुणांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी संयुक्त वार्ड नंबर तीन मधील सर्व पदाधिकारी, भगवा चौक तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta