Tuesday , March 3 2026
Breaking News

शेतीमालाच्या हमीभावासाठी लढा उभारणार : राजू पोवार

Spread the love

शिवापूरवाडीत रयत संघटनेचे उद्घाटन
निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधातील कृषी कायदा आणून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा देत आहेत.
शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तो हाणून पाडण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.शेतकरी, शेतमजूर व कामगार वर्ग यांनी एकत्र येऊन शेतीमालाच्या हमीभावासाठी व शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी एकजूट करून लढा उभारणार असल्याचे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. शिवापूरवाडी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
यावेळी निपाणी तालुकाध्यक्ष आय. एन. बेग यांनी, रयत संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन शेतकर्‍यांच्या हक्कासाठी निरंतरपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, कार्याध्यक्ष प्रविण सुतळे, युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, भोज येथील रमेश पाटील शिवापुरवाडी येथील विजय खोत, अनिकेत खोत, संजय जोमा, सदाशिव खोत, संदिप जोमा, शिवानंद पाटील, सुभाष खोत, सुनील खोत, आप्पासो खोत, सागर खोत, रामचंद्र चव्हाण, राजेंद्र खोत, अशोक खोत, महेश खोत, संजय खोत, राजेंद्र खोत, बेनाडी येथील मलगोंडा मिरजे, कुलदिप पाटील, जैनवाडी येथील नामदेव साळुंखे यांच्यासह गजबरवाडी, कुन्नूर, भोज परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *