
टेंभुर्णी संघ उपविजेता : प्रेक्षकांची भरभरून दाद
निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित ‘अरिहंत चषक’ शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा झालेल्या अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघ अरिहंत चषकाचा मानकरी संघ ठरला. विजेत्या संघाला उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, निरंजन पाटील-सरकार गजानन कावडकर व मान्यवरांच्या हस्ते रोख २१ हजार रुपये, अरिहंत चषक बक्षीस देण्यात आले.तर जयंत घोरपडे टेंभुर्णी या संघाला उपयोजिते पदावर समाधान मानावे लागले. त्या संघाला रोख १५ हजार रुपये व चषक देण्यात आले. तर पुणे येथील कावेरी नगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघानी सहभाग घेतला होता. दुसऱ्या दिवशी स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून गॅलरी खचाखच भरली होती.
साखळी पद्धतीने झालेल्या या सामन्यात उपांत्य सामना आय एसी ही मालेगाव आणि कावेरी नगर पुणे यांच्यात होऊन मालेगाव संघ विजयी ठरला. तर दुसरा उपांत सामना जयंत घोरपडे टेंभुर्णी आणि जामनेर संघात झाला. त्यामध्ये टेंभुर्णी संघाने विजय मिळवला.
उत्तम पाटील यांनी, काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक स्पर्धा भरवीत आहे. पण आपण युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी स्पर्धा भरवीत आहोत. दरवर्षी निरंतरपणे अशा स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. त्यासाठी अरिहंत उद्योग समूहातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्पर्धेमधील खेळाडूंची राहणे व जेवणाची व्यवस्था केली होती. याशिवाय प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची निर्मिती केली होते. सलग दोन दिवस दिवस रात्र प्रकाश झोतात या स्पर्धा पार पडल्या. पंच म्हणून सुरेश पाटील, अब्बास ऐतवडे, मिलिंद कोंडेकर, नियंत्रक म्हणून सदाशिव माने, लक्ष्मण साठे, आर. वाय. पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी कर्नाटक राज्य शूटिंग व्हॉलीबॉल नगरसेवक संजय सांगावकर, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, इमरान मकानदार, शिरीष कमते, माजी कॅप्टन नायकू भोसले, रईस सोलापुरे, सुधीर माळवी, जितेंद्र चेंडके, वरूण कुलकर्णी, रामा, शिंदे, सुनील तावदारे, शिवाजी निकम चेतन स्वामी, राजू कोळी, राजेंद्र मगदूम, मानाजी चेंडके, विद्यासागर उपाध्ये यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी व व्हॉलीबॉल शौकीन उपस्थित होते.
बी. एस. मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta