कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार झाल्याची घटना सोमवार तारीख सहा रोजी सायंकाळी 7 वाजता घडली.
चालक-मालक सुरेंद्र चव्हाण (वय 28) राहणार पालघर ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतः मालक व चालत असणारे सुरेंद्र चव्हाण आयशर गाडी घेऊन बेंगलोरहून मुंबईकडे जात होते. येथील आप्पाचीवाडी फाट्यावरच्या उतारतीला गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जोराची धडक बसली. या अपघातात चालक जागीच ठार झाला. आयशर ट्रक सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या खड्ड्यात आदळला.
घटनास्थळी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस सी पाटील, ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय एस ए टोलगी, पी डी गस्ती यांनी भेट दिली. एम एम औताडे रोड डेव्हलपरच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनातील मृतदेह काढून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवला.
Belgaum Varta Belgaum Varta