निपाणी (वार्ता) : येथील क्रांतीज्योती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अँड. शितल शिप्पुरकर होत्या.
प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी स्रियांनी हक्क व तरतुदी यांची माहिती करून घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा, असे मत निपाणी येथील कायदे तज्ञ अॅड शितल शिपूरकर यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती दबडे यांनी महिलांनी सजग राहून कायद्याचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी नगरसेविका अनिता पठाडे व क्रांतीज्योती महिला मंडळाच्या सल्लागार डॉ. शिल्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रांतीज्योती महिला मंडळाच्या वतीने विविध अभिनव उपक्रम राबवले जातात. यावर्षीही हळदीकुंकूच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास नगरसेविका रंजना इंगवले, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा शांतला मॅडम, सचिव डॉ. स्नेहल पाटील, संगीता चौगुले, उज्वला पठाडे, शरयू चव्हाण, वीणा बनगर , संजीवनी कदम, साजिदा पठाण, स्मिता शेणॉय, शांता तेरणे यांच्यासह विविध महिला मंडळांच्या सदस्या व इतर महिला उपस्थित होत्या. मंडळाच्या उपाध्यक्षा लतिका दैव यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख उज्वला महाजन यांनी करून दिली. हवाल वाचन सुनंदा हिरेमठ यांनी तर तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा पठाडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta