निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूल कित्तूर, येथे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश निवड चाचणी प्रक्रियेमध्ये, सरस्वती नवोदय प्रशिक्षण केंद्र निपाणीच्या विद्यार्थिनी कु. सुप्रना प्रकाश कांबळे, कु. नंदिनी नारायण जाधव, कु. आलिशा इरफान नदाफ या तीन विद्यार्थिनींनी भरघोस असे उत्तुंग यश संपादन करून, त्यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक श्री. रमेश पाटील सर यांचे विद्यार्थिनीना अनमोल असे मार्गदर्शन मिळाले असून, निपाणी भागातून शिक्षक व पालक वर्गातून विद्यार्थिनींचे आणि अध्यक्ष, प्रशिक्षक श्री. रमेश पाटील यांचे खूप कौतुक होत आहे. कु. सुप्रना ही कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ घटक निपाणीचे सहकार्यदर्शी श्री. पी. पी. कांबळे यांची ती कन्या आहे.
Belgaum Varta Belgaum Varta