सौंदलगा : सौंदलगा येथे परंपरेनुसार मध्यवर्ती भगवा झेंडा चौक व ग्रामपंचायत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
येथील मध्यवर्ती भगवा झेंडा चौक येथे झांज पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात ग्रामपंचायत अध्यक्ष दादू कोगनोळे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे व मनोहर शेवाळे, हरी इनामदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाऊ खाडे व कुलदीप चव्हाण यांनी प्रतिमेस हार अर्पण केला रामदास कुरले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तसेच ग्रामपंचायत येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष दादू कोगनोळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण, बंडा हातकर, एकनाथ हातकर, युवराज माळी, रामदास सूर्यवंशी, राजू खराडे, सचिन शिंदे, सागर पोवार, नागेश कुंभार, निवास कुंभार, प्रेम शिंदे, प्रणव यादव, नैतिक केसरे, सुजल चव्हाण, प्रल्हाद कारंडे, बबलू चव्हाण आदी ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta