Share

हजारो भाविकांची उपस्थिती : रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता
निपाणी (वार्ता) : करडी ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांचा आकाशाला गवसणी घालणारा आवाज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२१) झाला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते फुलले होते. दुपारी ३वाजता रथात बसण्यासाठी सवाल झाले.
महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून रथोसाचे उद्घाटन झाले.
कुमार कोठीवाले यांच्या हस्ते रथाला पहिली पार लावून रथोत्सवाला प्रारंभ झाला. बोरगाव प्राथमिक कृषी पतील संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी पहिला हार घालने आणि पहिला नारळ वाढवण्याचा मान पटकाविला. डाव्या बाजूला नारळ वाढविणे आणि उत्सवमूर्ती घेऊन खाली येण्याचा मान रावसाहेब वसेदार यांनी तर विकी चिडचाळे यांनी उजवी बाजू नारळ फोडण्याचा मान पटकावला.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा.सुभाष जोशी, बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील, राजेश कदम, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सुनील पाटील, रवींद्र चंद्रकुडे, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, संजय मोळवाडे, वीरू तारळे, गजेंद्र तारळे, रवींद्र शेट्टी, सदाशिव चंद्रकुडे, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, सुरेश शेट्टी, समीर बागेवाडी, मल्लिकार्जुन गडकरी, महेश दुमाले, शेखर चंदुरे, गजानन वसेदार, डॉ. महेश ऐनापुरे, दयानंद कोठीवाले, रवींद्र कोठीवाले, अमोल चंद्रकुडे, सिद्धेश कोठीवाले,दिलीप पठाडे उपस्थित होते.
मिरवणुकीत हत्ती, घोडे, जमखंडी, सांगली, बेडकिहाळ, कैंपट्टीतील बंड, करोशी, याद्यानवाडी, धुळगणवाडीतील करडीढोल व बँडपथकांचा समावेश होता.
कन्नड, मराठी, हिंदी भावगीत, भक्तिगीतांना भाविकांनी दाद दिली. रथोत्सव मार्गावर साखर, कापूर, खारीक, खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला.
भाविक रथाला तोरण बांधून नवस फेडताना दिसत होते. दोरखंडाने रथ ओढण्यासाठी भाविक गर्दी करत होते. गांधी चौकात रथ आल्यानंतर भाविकांनी अलोट गर्दी केली. मिरवणूक गांधीचौक, गुरुवारपेठ, कोठीवाले कॉर्नर, जुने बसवेश्वर चौक पोलिस ठाण्या मार्गे रात्री उशिरा महादेव मंदिरात पोचली. शुक्रवारी (ता. २४) दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले.
—-
विविध सवाल
विजय दुमाले, प्रशांत केस्ती, चिंतामणी वाळवे, ओंकार शिंदे, गिरीष यावगल, उमेश गंथडे, रावसाहेब वसेदार, आकाश भोपळे, राजू पोतदार, कीर्तीकुमार चडचाळे, आकाश बड्डे , प्रथमेश तिप्पे यांनी नारळ वाढविणे, कापूर लावणे, चवरी धरणे, नारळ देणे, उत्सवमूर्ती घेऊन खाली उतरणे, जंगटी वाजविणे, दिवटी धरणे, रथाला पार लावणे, हत्ती,घोड्यावर बसणे असे विविध सवाल पटकावले.
Post Views:
395
Belgaum Varta Belgaum Varta