या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर कवठेपिरान येथील किंग राजक्या या जोडीच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवून ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
नवतर घोडा गाडी शर्यतीमध्ये विवेक आलासे -कुरुंदवाड, ओंकार केसरकर निपाणी, आणि अक्षय म्हाळुंगे- म्हाळुंगे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ७ हजार ५ हजार आणि ३ हजाराची बक्षिसे पटकावली. एक्का घोडा गाडी शर्यतीमध्ये सदानंद घाटगे-निपाणी, शंकर भोसले आणि बबन खवरे -कोडणी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांची बक्षिसे पटकाविले.
शर्यतीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर सरकार, रोहित पाटील, अभियंते गजानन वसेदार, संजय कोठीवाले, सुकुमार गुरव, मलगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी शिवा भोसले, प्रदीप इंगवले, तात्यासाहेब वालीकर, अजित सासणे, धोंडीबा केसरकर, प्रभाकर केसरकर, उदय घाटगे, सुरेश पाटील, सोमनाथ पाटील, मारुती केसरकर, सुरेश केंगारे, महेश बोधले, अजित पाटील, जयवंत पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि शर्यती शौकीन उपस्थित होते.