

काकासाहेब पाटील : निपाणीत गॅरंटी कार्ड वितरण
निपाणी : आपल्या आमदार कीच्या काळात काळम्मावाडी पाण्याचा करार, वेदगंगा नदीपासून पाइपलाइन, खरी कॉर्नर येथे ब्रिज, निपाणी तालुका निर्मिती, निपाणी मतदारसंघ पुनरुज्जीवन अशी शाश्वत कामे केली आहेत. निपाणी रेल्वेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून सर्वेक्षण करेपर्यंत पाठपुरावा केला. पण त्यानंतर मंत्री आणि खासदार झालेल्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. याउलट राज्यातील भाजप सरकार मधील सर्व मंत्री ४० टक्के कमिशन घेऊन काम करत आहेत. त्यामुळे ९ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत.भाजपचे सरकार भ्रष्ट सरकार असून ते सत्तेबाहेर जाऊन राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे मत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. येथे काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी कार्ड वितरण आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विरकुमार पाटील होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, आपण आमदार आणि वीरकुमार पाटील मंत्री असताना काळम्मावाडी प्रकल्पास डोंगर भागातील आठ गावांसाठी बहुग्राम योजना राबविली. खडकलाट महालक्ष्मी उपसा सिंचन साठी पाठपुरावा केला. या उलट मंत्रीपद मिळाल्यानंतर शाश्वत कामाऐवजी त्यांनी अंडी घोटाळा केला, म्हणूनच त्यांचे महत्त्वाचे मंत्रिपद गेले. शिवाय सध्या २ टीएमसी पाण्याची गरज असून त्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, भाजपने देश व राज्याला देशोधडीला लावले असून पुन्हा कॉंग्रेसची सत्ता येणे काळाची गरज आहे. काँग्रेसचे तिकीट काकासाहेब पाटील यांनाच असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले अनमोल मत न विकता कॉंग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना द्यावे. राजा काँग्रेस सत्ता येताच २०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ, शिधापत्रिका वर प्रत्येक व्यक्तीला १० किलो तांदूळ, प्रत्येक कुटुंबातील महिला सदस्यांना दरमहा २००० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, माजी आमदार काकासाहेब पाटील यांना लोक आग्रहास्तव काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडनी तिकीट जाहीर केले आहे. तरीही विरोधक दिशाभूल करीत आहेत. कोणत्याही अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले.
प्रारंभी राजेश कदम यांनी स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी सदस्य राजेंद्र वड्डर, अण्णासाहेब हावले, सुप्रिया पाटील, किरण कोकरे, बख्तियार कोल्हापूरे, सिताराम पाटील, जीवन घस्ते, प्रमोद पाटील, रमेश जाधव, रेखाताई कांबळे, सुधाकर सोनाळकर, डॉ. बी. ए. माने, अनिल आडके यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महावीर मोहिते, बसवराज पाटील,रोहन साळवे, अशोक आरगे, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, किरण अल्लाबक्ष बागवान, अन्वर हुक्केरी, आप्पासाहेब पाटील, नवनाथ चव्हाण, प्रतीक शहा, अस्लम शिकलगार, अमोल बन्ने , विश्वास पाटील विष्णू कडाकणे, आप्पासाहेब हिंदळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक ढणाल सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta