बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात; विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : अकोळ येथील बाळूमामा देवस्थान भंडारा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत संदीप वाघमोडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, निशान व ढाल असे बक्षीस मिळविले.
विक्रम नांदेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे तर संदीप पाटील यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांकाचे ७००० रुपयांचे बक्षीस पटकावले. बिनदाती घोडा-बैलगाडी शर्यतीत अनुक्रमे दादासो खोत, विनायक व्हनाळे, सम्राट जगदाळे, घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये यश माने, विक्रम नांदेकर, नामदेव खोत, जनरल घोडा-बैलगाडी शर्यतीत अनुराग काटकर, चंद्रकांत नलवडे, विशाल सुतार यांच्या गाड्यांनी क्रमांक मिळविला.
प्रारंभी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते श शर्यतीचे उद्घाटन झाले. यावेळी यात्रा कमिटी सदस्य व नागरिक उपस्थित होते.
बाळूमामा भंडारा यात्राभक्तिमय वातावरणात साजरा झाला. त्यानिमित्त सकाळी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बाळूमामा देवालयामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. बाळूमामा देवस्थान कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
महालिंगराया देवस्थान यात्रेनिमित्त आयोजित ढोलवादन स्पर्धेमध्ये बेडकीहाळ वालग संघ, यमगर्णी वालग संघ, हेरवाड वालग संघ, अक्कोळ संघाने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. घोडागाडी शर्यतीत निलेश कुपीरे, पैलवान अकोळ, बाळू खोत यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.
Belgaum Varta Belgaum Varta