Share
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी (ता.२६) पूजन कार्यक्रम पार पडला. बेळगाव येथील किल्ल्याचे पूजन निपाणी मधील श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र बेळगावकर यांनी स्वागत केले. त्यानंतर किल्ल्यावरील तुळजाभवानी, ध्वज किल्ल्यावरील प्रमुख दरवाजा आणि गणेशाचे विधिपूर्वक पूजन झाले.
श्रीमंत दादाराजे देसाई यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. सैन्य दलाच्या पुढाकाराने त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. गुणवंत पाटील, रमेश रायजादे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीमंत दिलीपसिंह रायदाजे, श्रीमंत रमेश रायजादे, श्रीमंत युवराज सिद्धूजीराजे -निपाणकर, इंदिरा गायकवाड सुजाता स्वामी, किरण माने, महादेव माने, शहाजी पाटील, भिकाजी कुटाळे, बाळू पाटील, संजीव पारले, युवराज पाटील, अजित खराडे, सुजित गायकवाड, सचिन पावले, संतोष स्वामी, सुचिता रायजादे, नरेंद्र बेळगावकर, प्रशांत कामटे, रोहित येलूरकर, प्रशांत जाधव, रवी श्रीखंडे उपस्थित होते. सुनील जाधव यांनी आभार मानले.
Post Views:
232
Belgaum Varta Belgaum Varta