Thursday , March 5 2026
Breaking News

युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वा लाखाच्या विना लाठी-काठी बैल, घोडा-गाडी शर्यती

Spread the love
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.१ मार्च) सव्वा लाख रुपयाच्या विना लाठी- काठी बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यती आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव माळ पट्ट्यावर आयोजित या शर्यती सकाळी ८.३० वाजता होणार आहेत.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ३१ हजार रुपये,२१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहेत. जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १५ हजार,१० हजार आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. एक हलका ‘ड’गट बिनदाती घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये आणि ३ हजार रुपये व ढाल बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती वाढदिवस कमिटीने कळविली आहे.
————————————————
विविध उपक्रमांचे आयोजन
युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.१ मार्च)बोरगाव आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *