Share
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील महाशिवरात्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त उत्तम पाटील युवा मंच तर्फे संगोळी रायण्णा सेनेच्या सहकार्याने बकऱ्याच्या टकरी पार पडल्या. विविध गटातील विजेत्यांना तब्बल १ लाखाची बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निपाणी भागात प्रथमच भरवण्यात आलेल्या या मोठ्या प्रमाणावरील शर्यती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
तकरीतील दुधाच्या दाताच्या विभागात हनुमंत सरकार, नदीम पटेल -सांगली, बिरा खिलारे- अक्कोळ यांच्या बकऱ्यांनी अनुक्रमे ३ हजार,२ हजार १५०० रुपये, दोन दाती विभागात सदलगा क्रांती-सदलगा, बाळूमामा प्रसन्न- तेरणी, रायण्णा एक्सप्रेस गळतगा यांच्या बकऱ्यांनी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार २ हजार रुपयांची बक्षीसे मिळवली.
चारदाती विभागात साक आत्तार गळतगा, रायण्णा एक्सप्रेस-बुदलमुख, काळी -खडकलाट, सहा दाती विभागात किरण शेळके -कागल, इंडो बेकरी-कोल्हापूर, इमरान केक- कोल्हापूर यांनी अनुक्रमे ७ हजार ५ हजार ३ हजार रुपये, आठ दाती विभागात क्रांतिवीर संगोळी रायण्णा- सारापुर, मुत्तलकोड बिरसिद्धेश्वर- मुत्तलकोड, लक्ष्मीदेवी प्रसन्न-तोरणहळ्ळी यांनी २१ हजार, १५ हजार,१० हजाराची बक्षिसे मिळवली.
यावेळी नागराज खिलारे, आवडखान पुजारी, दत्ता खुबी, श्रीनाथ मुधाळे, दत्ता मुत्नाळे, नवनाथ पुजारी, किरण मायनावर, जाफर कोल्हापुरे, दयानंद भोपळे यांच्यासह रायान्ना सेना व उत्तम पाटील युवा मंचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
677
Belgaum Varta Belgaum Varta