नागरिकांतून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न
कोगनोळी : मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या पाच सहा वर्षांपासून हंचिनाळ ते कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंत रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला होता. नागरिकांच्या वतीने वारंवार मागणी करून देखील हा रस्ता तयार केला जात नव्हता. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्वांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मंत्री शशिकला जोल्ले यांनी लक्ष देऊन या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पासून रस्ता कामाची सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागणी असणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
रविवार तारीख 5 रोजी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, सदस्या विद्याताई व्हटकर, कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, शकील नाईकवाडे, कुमार व्हटकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला अन्य सूचना केल्या.
यावेळी बोलताना कुमार पाटील म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. रस्ता चांगला दर्जाचा झाला असून कोगनोळी हंचिनाळ, आडी, बेनाडी, सुळकुड यासह अन्य गावातील नागरिकांना या रस्त्याचा उपयोग होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta