प्राध्यापक सुभाष जोशी : कोनोळीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी
कोगनोळी : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेली विकास कामे कौतुकास्पद आहेत. 2000 साली आमदारकीच्या निवडणुकीत सोळाशे मतदान झाले होते. या ठिकाणी विरोध आहे. कोगनोळी येथे दबाव टाकून देखील इतक्या मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या हे कौतुकास्पद आहे. दबाव तंत्राचा वापर करून देखील महिलांनी कोणत्याही दबावाला न जुमानता केलेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी युवा नेते उत्तम पाटील यांच्या वादळाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात या वादळात सर्व नेतेमंडळी उडून जातील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम पाटील यांना मतदान रुपी आशीर्वाद करावा, असे आवाहन माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे आयोजित हळदीकुंकू, होम मिनिस्टर, गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, वीरश्री पाटील, निपाणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंत्रे, मनीषा परीट, महादेवी पोवाडे, शोभा मानगावे, अनिता भोजे आदी उपस्थित होते.
मराठा मंडळचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात उत्तम पाटील यांनी कोगनोळीमध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्व स्तरातील, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केले आहे. समाजकारण करण्यासाठी आपण प्राधान्य दिले आहे. समाजकारण करत असताना राजकारणाची गरज भासते. यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आपला मुलगा भाऊ समजून मतदान रुपी आशीर्वाद करावेत असे आवाहान त्यांनी यावेळी केले.
यावेळी हर्षला पाटील, समृद्धी पाटील, भक्ती जाधव, धनपाल दिवटे, रोहिणी ढोबळे, आराध्या पाटील, आर्या पाटील, योगिता पोवार, अनिल घस्ते, कुमार पाटील, संभाजी माने, सुरज पांगिरे, आनंदा इंगवले, बाजीराव मोर्डे, आर के धनगर, रामगोंडा पाटील, धीरज पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी आर डी कागले, किरण चौगुले, सचिन इंगवले, प्रवीण पाटील, प्रीतम शिंत्रे, प्रशांत पोवाडे, दीपक कदम, योगेश पाटील, कीर्ती पाटील, तात्यासो खोत, गजानन खोत, के डी पाटील, सी के पाटील, लक्ष्मण आबने, किसन पोटले, सचिन परीट, विठ्ठल मुरारी कोळेकर, अभिजीत गायकवाड, कृष्णात भोजे, रावसाहेब पसारे यांच्यासह उत्तम पाटील युवाशक्तीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta