१२ ट्रॅक्टर चारा बचावला ; पोलिसात तक्रार दाखल
निपाणी (वार्ता) : निपाणी- चिकोडी रोडवर असलेल्या समाधी मठामध्ये प्राणलिंग स्वामींच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपासून गोशाळा सुरू आहे. त्यामुळे गाई साठी शहर व परिसरातील अनेक भाविक देणगी दाखल चारा देत आहेत. पण भाविकांनी दिलेल्या या चाऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी रविवारी दुपारी दोन वाढण्याचा सुमारास अचानक आग लावली. त्यामुळे दोन ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला. प्राणलिंग स्वामी व कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवून पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित दहा ते बारा ट्रॉली चारा बचावला आहे.
याबाबत घटनास्थळावर मिळालेले अधिक माहिती अशी, समाधी मठातील गोशाळेत शहर व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गाई गो पालण्यासाठी दिल्या आहेत. त्यांची सर्व व्यवस्था प्राणलिंग स्वामी व कार्यकर्ते करत आहेत. यंदाच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील अनेक शेतकरी व दानशूर व्यक्तींनी या शाळेला विविध प्रकारचा चारा देत आहेत. सध्या १४ ट्रॅक्टर चाऱ्याचा साठा झाला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता सुमारास काही समाजकंटकांनी या चाऱ्याला आग लावली.
परिसरातील एका दानशूर व्यक्तीने चारा देण्यासाठी गोशाळे जवळ प्रवेश केला. त्याचवेळी एका कार्याच्या बडीमिला आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ प्राणलिंग स्वामी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यामुळे समाधी मठाजवळ असलेल्या विहिरीचे विद्युत मोटर चालू करून कार्यकर्ते व स्वामींनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित १२ ट्रॉली चारा बचावला आहे. समाजकंटकांच्या या कृत्याचा स्वामींनी निषेध केला आहे.
यावेळी प्राणालिंग स्वामी, प्रभू लिंग स्वामी, विकास आर्य, सागर श्रीखंडे, सुनील पावले, अप्पा धनगर, अभिषेक कागवड़, सुनील हड़पड, सम्मेद कागे, गंगाधर विजयनगरे, मल्लू मादर, सिद्दू मादर, ओमकार कट्टी, आदित्य रांगोळे, अजित माने, गणेश सातवर, किशोर कागलकर, स्वयम कमते, समर्थ रोड़के, श्रीशैल मादर, राजाराम हजारे यांच्यासह समाधी मठातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी आग विझवली.
Belgaum Varta Belgaum Varta