निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महा विद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुहास न्हिवेकर यांनी दिलेल्या प्रदीर्घ अशा ३७ वर्षाच्या सेवेनंतर त्यांना महाविद्यालयांमध्ये सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देऊन त्यांचा
जनता शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या जी. डी. इंगळे या होत्या.
महाविद्यालयातर्फे उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, विविध विभाग प्रमुख, आजी-माजी प्राध्यापक, जनता शिक्षण मंडळ पतसंस्था, जिमखाना विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागितर्फेही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. अशोक पवार, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय पाटील, सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच आजी-माजी प्राध्यापक उपस्थित होते. संचालक प्रदीप मोकाशी, डॉ. अशोक दाता, प्रा. नानासाहेब जमादार, डॉ. सुजाता पाटील, डॉ. रमेश साळुंखे, डॉ. रवींद्र दिवाकर, डॉ. पी. वाय. पाटील, डॉ. सी. एम. नाईक, उपप्राचार्य अशोक पवार, प्रा. कांचन पाटील बिरनाळे, दत्तात्रय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुहास न्हिवेकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्वागत व प्रास्ताविक स्टाफ वेलफेअर समिती निमंत्रक डॉ. आनंद गाडीवड यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. कृष्णामाई कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सदानंद झळके यांनी केले. त. राजकुमार वाईंगडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta