Share

कार्यालयातील बैठकीत घोषणा : पहिल्या यादीतच मिळाली उमेदवारी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) विधानसभेसाठी निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच निपाणी भागात विधानसभेसाठी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उत्तम पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्याबाबत त्यांनी आपल्याला संपर्क साधून मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विचाराने ही उमेदवारी विश्वासपूर्वक दिली आहे. त्यासाठी आपण मुश्रीफ आणि मंत्री जयंत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतली होती. त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून निपाणी मतदारसंघातून विजय मिळवणार आहे. त्यासाठी या भागातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा अभ्यास करून त्यांच्या नेतृत्वाखाली या पुढील काळात काम करून या मतदारसंघात यश खेचून आणणार आहे. आपल्या प्रचारासाठी शरद पवार येणार आहेत. कर्नाटकात जाहीर झालेल्या पहिल्या राष्ट्रवादीचे यादीमध्ये आपणास संधी मिळाली आहे. त्या संधीचा उपयोग करून आपण ही निवडणूक लढवणार आहे. आपण नाराज असून माझे काम पाहूनच उमेदवारी दिल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्तम पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. लवकरच बी फार्मसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी स्वागत केले.
यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, अशोककुमार असोदे, राष्ट्रवादी चिकोडी जिल्हा अध्यक्ष जावेद काझी, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, दत्ता नाईक, शेरू बडेघर, दीपक सावंत, संजय पावले, गोपाळ नाईक, राजू पाटील-अक्कोळ, निरंजन पाटील, गजानन कावडकर, इम्रान मकानदार, शिरीष कमते, अरुण निकाडे, के. डी. पाटील, आनंदा कुंभार, अभयकुमार मगदूम, सांगापा ऐदमाळे, सचिन बिंदगे निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
997
Belgaum Varta Belgaum Varta