उत्तम पाटील : रामनगरमध्ये बैठक
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विकास आला जात असला तरी अजूनही उपनगरात अनेक समस्या तशाच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहेत. अद्याप उपनगरात २४ तास पाण्यासह इतर कामे बाकी आहेत. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबी गांभीर्याने घेऊन उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही उत्तम पाटील यांनी दिली. येथील रामनगर युवक, महिला मंडळ आणि नागरिकांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
नगरसेवक दिलीप पठाडे यांनी, आतापर्यंत रामनगरासह परिसरातील विकास कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुढील काळात विकास साधण्यासाठी उत्तम पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक दत्ता नाईक, निरंजन पाटील -सरकार, सोमनाथ शिंदे, संजय सूर्यवंशी, अक्षय शिंदे, अमित वाजरे, पांडुरंग चलवादी, बाबासाहेब कांबळे, शैलेंद्र कांबळे, शिवानंद चवनाईक, रवींद्र शेळके, सोमनाथ शेळके, शेखर कदम, ऋषी ठाकरे, कौस्तुभ जाधव, कुणाल कांबळे, पांडुरंग साळुंखे, नंदकिशोर जिरगे यांच्यासह राम नगर युवक व महिला मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. ओंकार शिंदे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta