Share

रविवारी आप्पाचीवाडीमध्ये प्रचाराचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.२०) सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री वीकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री वीकुमार पाटील यांनी, काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील हे ११० टक्के निवडून येणार आहेत. याबाबत कोणीही शंका बाळगू नये. याशिवाय राज्यात काँग्रेसचे सरकार येणार आहे.
काकासाहेब पाटील यांनी, विधान सभा निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.आप्पाचीवाडी येथे रविवारी (ता.२३) प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तसेच स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गज नेते मंडळी येणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर आपले प्रेम असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, बेडकीहाळ भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष बसवराज पाटील, किरण कोकरे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, सुजय पाटील, रमेश जाधव, युवा नेते रोहन साळवे, विश्वास पाटील, अण्णासाहेब हवले, निकु पाटील, अशोक लाखे,संकपाळ, सुनील गाडीवडर, राजेंद्र चव्हाण, सिताराम पाटील, लक्ष्मण हिंदलकर, बाबुराव खोत, विश्वास आबणे, फजल पठाण, अन्वर हुक्केरी, रामचंद्र कवाळे, शशिकांत पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
1,828
Belgaum Varta Belgaum Varta