Share
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी टोलनाक्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास प्रवाशाकडील दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निरंजन पी. शेट्टी (राहणार मुडबिद्री) असे पैसे जप्त करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, रात्री सव्वा दहाच्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी निरंजन शेट्टी यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दीड लाख रुपये आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे रकमेचा तपशील मिळाला नसल्याने रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, कोगनोळी तपासनाका अधिकारी कृष्णा नाईक, राजू गोरखनावर, शिवप्रसाद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Post Views:
219
Belgaum Varta Belgaum Varta