उत्तम पाटील : कार्यकर्त्यांशी साधला संवाद
निपाणी (वार्ता) : शहराबरोबर उपनगराचेही अजूनही अनेक समस्या तशाच आहेत. त्याच्या सोडवणुकीडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भविष्यात या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील
चव्हाण मळा परिसरातील नागरिकांची भेट घेऊन आयोजित बैठकीत मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी चव्हाण मळ्यासह गव्हाण व तवंदी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उत्तम पाटील यांना भरघोस पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तम पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.याप्रसंगी चव्हाण मळा, गव्हाण, तवंदी गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला, युवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील सटवाई रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पाटील यांचे प्रचार कार्यालयाचा प्रारंभ नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
उत्तम पाटील म्हणाले, सध्या मतदारसंघात ईर्षचे राजकारण सुरू असून ग्रामीण भागात आपली सत्ता असलेल्या पंचायतीमध्ये अडचणी निर्माण केला जात आहेत. त्यामुळे यापुढे काळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी अकोळचे राजू पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, संजय सांगावकर, गोपाळ नाईक, डॉ.जसराज गिरे, संजय पावले, सचिन पोवार, सुनील राऊत, शिरीष कमते, इम्रान मकानदार, रमीज मकानदार, अवि सांगावकर, स्मिता दुमाले, सचिन हेगडे, जीवन गस्ते, रॉबिन दावणे, आनंद केंगारे, सर्जेराव नाईक, राजू निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta