Monday , December 23 2024
Breaking News

निपाणीत अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई वाहतुकीच्या कोंडीसह अपघात

Spread the love

शिस्त लावण्याची मागणी

निपाणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बस संप सुरू असल्याने येथील बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक वेळा अंधारात रस्त्यावरच वाहने लावून प्रवाशांना निर्माण करत आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी येथील बसस्थानक परिसरात निपाणी – कोल्हापूर रोडवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणार्‍या वाहनधाकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा आहे. त्यामुळे कारवाईची उगारला वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
येथील कोल्हापूर -निपाणी रोडवर बस स्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने खाजगी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. शिवाय वाहने लावण्यावरून वाहनधारकांमध्ये वारंवार भांडणाचे प्रकार होत आहेत. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या बाबी पोलिसांच्याही निदर्शनास आल्या होत्या. मात्र आजपर्यंत कारवाई झाली नव्हती. अखेर बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात अनधिकृतपणे वाहन पार्किंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच बाहेरगावाहून येणार्‍या वाहनांना ताकीद देवून सोडले जात आहे. या कारवाईमुळे वाहनधारक धास्तावले असून वाहने अन्यत्र पार्किंग केली जात आहेत. या कारवाईमुळे परिसरात वाहने पार्किंग करणार्‍यांची संख्या कमी झाली होती. खाजगी वाहनधारकांचे अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी पोलीस कारवाईत सातत्य असणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया शहरवासीयातून उमटत आहेत.
—–
बेदरकार वडाप वाहने
यापूर्वी बस स्थानक परिसरातील कोल्हापूर मुरगुड रोड, चिकोडी रोड परिसरात स्थानिक पातळीवरील वडाप वाहने लावली जात होती. पण महाराष्ट्रातील बस चालकांचा संप असल्याने मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहने वाढली आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

हुक्केरीतील चोरी प्रकरणांचा दोन दिवसांत लावला छडा

Spread the love    हुक्केरी : हुक्केरी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *