Wednesday , December 10 2025
Breaking News

विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक

Spread the love

 

युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत.
येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील सामाजिक- आर्थिक परिस्थितीमुळे २०२३ ची निवडणूक भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत लागली आहे.
तंबाखू लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघात वेदगंगा आणि दूधगंगा या दोन नद्या वाहत असल्याने या मतदारसंघातील शेतकरी उसासारख्या पिकांकडे वळले आहेत. परंतु उन्हाळ्यात या नद्या कोरड्या पडणे ही एक मोठी समस्या आहे. औद्योगिक विकास अपेक्षित धर्तीवर होत नसल्याने कुशल तरुणांना नोकऱ्यांसाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागत आहे.
राज्याच्या पुनर्रचनेनंतरच्या सुरुवातीच्या वर्षांत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने उभे केलेल्या उमेदवारांना मतदारसंघातील लोकांनी पाठिंबा दिला. परंतु जसजशी वर्षे उलटली, तसतशी त्यांनी मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. मराठी ही त्यांची मातृभाषा असूनही राज्याशी एकरूप झाले.
२०१३आणि २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून मतदारसंघातून निवडून आलेल्या मुजराई आणि वक्फ मंत्री लिंगायत समाजाच्या शशिकला जोल्ले या पुन्हा एकदा विजयाच्या हॅट्रिकसाठी निवडणुक रंगनाथ उतरले आहेत. त्या लोकप्रिय ठरल्या असले तरी मतदारसंघाचा अपेक्षित विकास न झाल्याने त्यांना सत्ताविरोधी धोक्याचा सामना करावा लागणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील हे मराठा तर दुसरे प्रबळ समुदाय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील हे जैन समाजाचे असल्याने येथे जातीय नियोजन महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मतदारसंघात २ लाख२३ हजार २२ मतदार असून १, लाख १२ हजार ७१३ पुरुष, १ लाख १० हजार ५०० महिला आणि ९ इतर मतदार आहेत. जातीनुसार ४० हजार मतदार लिंगायत, ३ हजार २०० मतदार ब्राह्मण, २० हजार ५०० मतदार अनुसूचित जाती, ८६० अनुसूचित जमाती, २१ धनगर मतदार, मुस्लिम २६ हजार मतदार, जैन २२ हजार मतदार, मराठा ५१ हजार मतदार आहेत.
२०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील निवडून आल्याने जोल्ले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१३ आणि २०१८ च्या निवडणुकीत त्यांनी पाटील यांचा सरळ लढतीत पराभव केला. चौथ्यांदा या दोघांमध्ये थेट लढत होत असून विजयासाठी दोघेही तितकेच सकारात्मक आहेत.
————————————————–
‘निपाणी तालुक्यात रेल्वेची कमतरता आहे. कराड- निपाणी- रेल्वे मार्ग विकसित झाल्यास निपाणी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल.’
-किरण कोकरे, माजी सभापती निपाणी
——————————————————–
‘दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे काळम्मावडी धरणातील पाणीसाठा ६ टीएमसीएफटीपर्यंत वाढविण्याबाबत महाराष्ट्राशी करार करणे आवश्यक आहे.’
-निकु पाटील, शेतकरी, निपाणी
———————————————————–
‘निपाणी तालुक्यातील तरुण रोजगारासाठी एमआयडीसी, कोल्हापूरवर अवलंबून आहेत. निपाणीमध्ये उद्योगांची स्थापना केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.’
-विश्वास पाटील,निपाणी
———————————————————–
‘निपाणीच्या लोकांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत बेळगाव किंवा कोल्हापूरला धाव घ्यावी लागत असल्याने त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे. शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर आपला माल विकावा याची खात्री करण्यासाठी या शहराला फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि आधुनिक बाजारपेठा यासारख्या सुविधांचीही गरज आहे.’
-प्रा. नानासाहेब जामदार, निपाणी
———————————————————–
निपाणी मतदारसंघातील प्रश्न
*सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज
*तरुणांना रोजगारासाठी औद्योगिक विकास
*बाजारपेठा, फूटपाथ, नाले, सार्वजनिक शौचालये
*मूलभूत पायाभूत सुविधा
*कराड- निपाणी रेल्वे मार्ग आवश्यक

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *