धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवा राजू पोवार ; सौंदलगा येथे प्रचार सभा
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्यामागे कुठलीही राजकीय शक्ती नसून आपल्या घरात कोणीही आमदार खासदार नाही.माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व व माजी मुख्यमंत्री कार्यरत आहेत. रयत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे व कार्यकर्ते आणि मतदारांच्या बळावरच माझा विजय निश्चित आहे, असे मत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांनी व्यक्त केले.
सौंदलगा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, जनतेच्या पाठिंबामुळच निपाणी तालुक्यात प्रतिनिधित्व करत आहे. येथील शेतकरी आणि मतदारांनी आपल्यावर प्रेम करून आपल्या कुटुंबाची नाळ जोडली आहे. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना माझ्या कुटुंबाचा कधीच विचार केला नाही. विरोधक अनेक टीका करत असले तरी त्याला आपण घाबरणार नाही. विरोधी उमेदवार २२०० कोटीची कामे केली असली तरी मतदारसंघात अनेक समस्या अजूनही तशाच आहेत. जनता ही स्वाभिमानी असून या निवडणुकीत आपल्यालाच विजयी करतील.
राजू पोवार पुढे म्हणाले, आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.
निपाणी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन विविध अडचणी समजावून घेऊन त्या मार्गी लावण्याचे काम यापूर्वी केले आहे. प्रत्येक गावागावात मला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी सत्ताधारी पक्षाला नागरिक कंटाळले आहेत. कार्यकतें गावागावांत कोपरा सभा आणि घरोघरी प्रचार करत आहेत.
निपाणी मतदारसंघात निवडणूक रिंगणात धनदांडगे असले तरी सर्वसामान्यांची कामे केल्याने सर्व स्तरांतून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातील बळीराजा आता जागृत झाला असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविलेल्या आणि कर्जमाफी योजना केलेल्या कुमारस्वामी यांच्या धजद पक्षावर विश्वास बसला आहे.
बेरोजगार युवकांसाठी कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करून रोजगार उपलब्ध करणार आहे. याशिवाय महिलांना तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देऊन घरबसल्या उद्योग- व्यवसाय करण्यासाठी कर्जपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय महिलांसाठी विशेष गारमेंट योजना सुरू केली जाणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले. यावेळी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या राज्य महिला सचिव सुनिता व्होनकांबळे, रमेश पाटील, रोहन पाटील यांच्यासह धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta