Wednesday , December 10 2025
Breaking News

विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी उत्तम पाटलांना विधानसभेत पाठवा

Spread the love

 

शरद पवार : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा

निपाणी (वार्ता) : कर्नाटकात चाललेली राजकता आणि भ्रष्टाचारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पैशाचा वापर करून सरकारही पाडले जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यावर होत आहे. ही चिंतनिय बाब असून अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उत्तम पाटील यांना विजय करून विकासाची चळवळ गतिमान करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

येथील विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रसारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, कर्नाटकात सध्या ४० टक्के कमिशनचे सरकार सुरू आहे. या सरकारने आता नवीन धोरण अवलंबिले आहे. त्याची संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे.हे कमिशनचे लोन हळूहळू देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही. मतदारांनी दिलेली सत्ताही सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरायची असते. पण भाजप येथील मंत्री व नेते मंडळींनी स्वतःच्या विकासासाठी सत्तेचा वापर सुरू केला आहे. त्याची नोंद या निवडणुकीत घेण्याची गरज आहे.
डॉक्टर आंबेडकरांचा घटनेवर देश चालत असताना त्यांच्या जयंती दिवशी अशोक दिन म्हणणे अक्षपार्ह आहे. पाणी आणि विजय बाबाचे धोरण त्यांनी अवलंबल्याने ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते त्यातूनच देशाला अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे केवळ आंबेडकरांचाच नव्हे तर शेतकरी व सर्वसामान्यांचाही अवमान आहे. त्यामुळे आता अशा मंत्रांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. पाणी आणि शेती मधूनच उसाचे उत्पन्न मिळते. ऊस संशोधन किंमत ठरविण्याच्या कमिटीचा आपण अध्यक्ष असून दर्जेदार ऊस पिकविल्यास योग्य भाव देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यापूर्वी काँग्रेसच्या काकासाहेब यांच्या निवडणुकीत आपण प्रचारासाठी आलो होतो. आता निवडणुकीत थांबण्याची त्यांची वेळ नव्हती. तरीही त्यांनी निवडणूक लढवली असून विकासाची चळवळ पुढे घेऊन जाणाऱ्या उत्तम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी, दहा वर्षे सत्ता असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विरोधकांना सोडवता न आल्याने राष्ट्रवादीच्या रूपाने उत्तम पाटील हा नवा चेहरा दिला आहे. त्यांच्याकडे समस्या सोडवण्यासह विकास कामांचा आराखडा तयार आहे त्यामुळे पुढील पंचवीस वर्षे नेतृत्वाचा प्रश्न संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्तम पाटील यांनाच निवडून द्यावे. राष्ट्रवादी हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना सरकारने फौजदाराचे हवालदार केले आहे. फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मापे काढू नयेत. २०२४ साली राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचे सांगितले.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी, वेदगंगा आणि दूधगंगे नंतर प्रथमच निपाणीत लोकगंगेला पूर आल्याने उत्तम पाटील यांचा विजय निश्चित आहे. तब्येत बरी नसताना काकासाहेब पाटील यांना निवडणुक न लढविण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यांनी निवडणूक लढवली असून अजूनही वेळ गेलेली नसून उत्तम पाटील यांना पाठिंबा द्यावा. आता बिरेश्वर विरुद्ध अरिहंत अशी कुस्ती असून त्यामध्ये अरिहंतच बाजी मारणार असल्याचे सांगितले.
उमेदवार उत्तम पाटील यांनी, आपण काँग्रेससाठी काम करूनही तिकीट डावलले गेले. तरीही खचून न जाता दूरदृष्टी असलेल्या शरद पवार यांनी आपल्याला तिकीट दिल्याने दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. मतदारसंघात अनेक समस्या असतानाही कोट्यावधी रुपयाची कामे केल्याचा डांगोरा भाजपाच्या मंत्री महोदय पीटत आहेत. त्यामुळे मतदारांची दिशाभूल करणाऱ्या या उमेदवारांच्या अपवाला बळी न पडता आपणाला विजयी करण्याचे आवाहन केले. त्यावेळी शितल फराकटे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस रावसाहेब पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजू आवळे, प्रा.सुभाष जोशी, अभिनंदन पाटील, अशोककुमार असोदे, सुनील पाटील, रवींद्र शिंदे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगरसेवक मान्यवर, कार्यकर्ते मतदार व महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *